घरताज्या घडामोडीSanjay Raut vs Kirit Somaiya : निकॉन इन्फ्रामध्ये PMC ची दमडीही नाही,...

Sanjay Raut vs Kirit Somaiya : निकॉन इन्फ्रामध्ये PMC ची दमडीही नाही, राकेश वाधवान पार्टनर नाही, किरीट सोमय्यांचा खुलासा

Subscribe

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये याच प्रकरणामध्ये मेधा सोमय्यांच्या नावे सामना दैनिकात पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या होत्या. तसेच दोन वर्षांपूर्वी नील सोमय्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. विधानसभेत या विषयावर लक्षवेधीही मांडम्यात आला होता. त्यामुळे आम्ही एकही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी, असे खुले आव्हान किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याची कंपनी निकॉन इन्फ्रामध्ये पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्यातील पैसे असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच पीएमसी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या राकेश वाधवान या कंपनीत बिझनेस पार्टनर होता, असाही आरोप राऊतांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. निकॉन इन्फ्रामध्ये पीएमसी घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आलेला नाही. तसेच निकॉन इन्फ्रामध्ये राकेश वाधवान हे पार्टनर नसल्याचीही खुलासा त्यांनी केला आहे. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करावी, असेही आव्हान किरीट सोमय्या दिले. (kirit somaiya denied pmc bank investment nicon infra rakesh wadhawan not partner in neel somaiya company)

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये याच प्रकरणामध्ये मेधा सोमय्यांच्या नावे सामना दैनिकात पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या होत्या. तसेच दोन वर्षांपूर्वी नील सोमय्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. विधानसभेत या विषयावर लक्षवेधीही मांडम्यात आला होता. त्यामुळे आम्ही एकही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी, असे खुले आव्हान किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून दिले. माहिती अधिकाराच्या प्रकरणात प्रताप सरनाईक यांच्या माणसाने फोटो व्हायरल करत मला नोटीस पाठवली. मग गुन्हा दाखल करत मला अटक का केली नाही ? असाही सवाल किरीट सोमय्यांनी विचारला. आम्ही काहीही खोट केलेले नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisement -

संजय राऊत मुद्दा भरकटवत आहेत

लडाणी फ्रंटमॅन नसल्याचाही खुलासा त्यांनी केला. २० वर्षापूर्वी शौचालय बांधले, त्याचीही चौकशी प्रताप सरनाईककडून करण्यात येत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी चौकशी करावी, आम्ही अपिलही करणार नाही. संजय राऊतांना डायव्हर्ट करायचा आहे, मुख्यमंत्री त्यांचे नेता आहे. आम्ही कोविड घोटाळ्यावर प्रश्न केला, प्रवीण राऊतांचे संजय राऊतांशी काय कनेक्शन आहे ? याची विचारणाही केली. घोटाळ्यावर मात्र राऊतांनी काहीच खुलासा केला नाही. राऊत फक्त विषय डायव्हर्ट करत वेळ काढत असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला.


Sanjay Raut : कोठडीचे सॅनिटायजेशन सुरू…, बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊतांचे ट्विट

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -