सेनेला खिंडार ! माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे गटात

सेनेला खिंडार ! माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे गटात

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ शिंदे गटात 

नाशिक : खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर इगतपुरी तालुक्यातुन शिवसेनेला दुसरा धक्का बसला असून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. एकनाथ शिंदे गटात रोजच शिवसैनिक, पदाधिकारी यांचा नव्याने प्रवेश होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील अनेक नेते, कार्यकर्ते शिंदे गटात सामील होतांना दिसत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले खासदार व आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. कारण रोज नव्याने प्रवेश होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. काशिनाथ मेंगाळ यांनी जयंत साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २१ जुलैला नाशिक जिल्हा दौरा केला होता. त्यावेळी घोटी टोलनाक्यावर माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. मात्र यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे उपस्थित नव्हते. मात्र मेंगाळ यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावले होते. मात्र मेंगाळ यावेळी हजर नसल्याने ते शिंदे गटात दाखल होतील अशा चर्चांना उधाण आठवडाभरापूर्वीच आले होते.

कारण यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटात शिवसैनिक सामील होत असल्यामुळे येणार्‍या निवडणुकीत फुटीचे नक्की पडसाद पाहायला मिळतील. सोमवारी (दि. २५) रात्री उशिरा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेचे जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील झाले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठनेते रघुनाथ तोकडे, घोटी ग्रामपालिकेचे माजी सरपंच संजय आरोटे, माजी सरपंच खंडेराव धांडे, संदीप शिरसाठ, जयराम गव्हाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दर्शविले आहे.

जिल्हाप्रमुख तथा नुसतेच सहसंपर्कप्रमुख झालेल्या तांबडेचाही जय महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी बंडखोरी केली असून ते शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाने जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीत त्यांना दिंडोरीचे सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले होते.
शिवसेनेतील बंड थंड होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यापूर्वीच भाऊलाल तांबडे यांनीही शिंदे गटात जाणे पसंत केले. खासदार हेमंत गोडसे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी भाऊलाल तांबडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना शिवसेना पक्षाकडून जिल्हाप्रमुखपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सुनील पाटील हे निष्ठावान असल्यामुळे त्यांच्या जागेवर तांबडे यांची नियुक्ती करण्यास पक्षश्रेष्ठींनी नकार दिल्याचे समजते. दरम्यान, भाऊलाल तांबडे हे शिंदे गटात गेले तरी त्यांच्या फेसबूक पेजवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच फोटो आहे.

First Published on: July 27, 2022 2:56 PM
Exit mobile version