आणखी एका ‘शिवशाही’ला आग, पुणे-नाशिक मार्गावर बर्निंग बसचा थरार

आणखी एका ‘शिवशाही’ला आग, पुणे-नाशिक मार्गावर बर्निंग बसचा थरार

पुणे – शास्त्रीनगर येथे शिवशाही बस पेटण्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शिवशाहीला आग लागली. आज सकाळी पुणे नाशिक मार्गावर सिन्नरजवळ ही घटना घडली. या घटनेत प्रवासी बालंबाल बचावले.

राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यानंतर ती संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही बस सकाळी आठच्या सुमारास माळवाडी शिवाराजवळ आली असता गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. त्यामुळे चालकाने तत्काळ बस रिकामी केली. या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होती.

हेही वाचा – पुण्यात भररस्त्यात शिवशाहीला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ प्रवासी बालंबाल बचावले

रस्त्याच्या बाजूला बस उभी केल्यानंतर प्रवाशांना गाडीतून उतरवण्यात आलं. बसमधून प्रवासी उतरताच काही वेळातच बस पूर्णपणे पेटली. यामुळे स्थानिकांनी तेथे मोठी गर्दी केली. स्थानिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने उग्र रुप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

कालही लागली होती शिवशाही बसला आग

पुण्यातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शिवशाही बसला आग लागली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ही बस येरवाडमधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ आली. तेव्हा चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवलं. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगवधनामुळे तब्बल ४२ प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान, ही बस सतत गरम होत होती. तरीही ती पुण्यापर्यंत आली. त्यानंतर चालकाला बिघाड झाल्याचं लक्षात येताच त्याने गाडी रिकामी केली.

First Published on: November 2, 2022 12:41 PM
Exit mobile version