घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात भररस्त्यात शिवशाहीला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ प्रवासी बालंबाल बचावले

पुण्यात भररस्त्यात शिवशाहीला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४२ प्रवासी बालंबाल बचावले

Subscribe

पुणे – पुण्यात आज सकाळपासून आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली आग एका हॉटेलला लागली होती. ही आग विझत नाही तोवर शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात धावणाऱ्या शिवशाही बसला आग लागली. सुदैवाने या दोन्ही आगीत जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा – नाशिक औरंगाबाद महामार्गावर शिवशाही बसला अपघात

- Advertisement -

पुण्यातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शिवशाही बसला आग लागली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ही बस येरवाडमधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ आली. तेव्हा चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवलं. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगवधनामुळे तब्बल ४२ प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान, ही बस सतत गरम होत होती. तरीही ती पुण्यापर्यंत आली. त्यानंतर चालकाला बिघाड झाल्याचं लक्षात येताच त्याने गाडी रिकामी केली.

हेही वाचा – पुण्यात अपघातांची मालिका थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरच्या धडकेत 1 ठार, 6 जखमी

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसला आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शिवशाही बसेसची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी करण्यात येतेय. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही शिवशाही बसला आग लागली होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -