सिंहगड किल्ला पुढचे चार दिवस बंद

सिंहगड किल्ला पुढचे चार दिवस बंद

Landslide

जर तुम्ही सिंहगडावर ट्रेकसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा. कारण सिंहगड किल्ला पुढचे चार दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रविवारी पहाटे सिंहगड घाटामध्ये दरड कोसळली होती. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दरड हटवण्यामध्ये मोठी अडचण येत असल्याचे हवेली पोलीस आणि वनविभागाने सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

दरड हटवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार

रविवारी पहाटे सिंहगड घाटामध्ये मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळच्या सुमारास ही घटना घटना घडल्यामुळे गडावर कोणी पर्यटक गेले नव्हते. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. तसेच पर्यटक गडावर अडकले नाही. ही दरड हटवण्याचे काम अजूनही सुरु आहे. पावसामुळे दरड हटवण्यात अडचणी येत आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी आणखी दोन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

आणखी दरड कोसळण्याची शक्यता

पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आणखी दरड कोसळ्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी सिंहगडावर जाऊ नये असं आवाहन वन विभाग आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे. काल सिंहगडावर ट्रेकसाठी आलेल्या पर्यटकांना अर्ध्यातून परत जावे लागले होते. त्यामुळे ते नाराज झाले होते.

संबंधित बातमी –

सिंहगड घाटात दरड कोसळली; रस्ता बंद

First Published on: July 9, 2018 6:19 PM
Exit mobile version