पिंपरी-चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्ता महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल

पिंपरी-चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्ता महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल

पिंपरी-चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्ता महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ता महिलेला एका अश्लील व्हिडिओ कॉल आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४६ वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्ता या पिंपरी-चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे राहतात. बुधवारी घरात असताना त्यांना अनोळखी नंबरवरुन व्हिडिओ कॉल करु का? असा व्हॉटसअॅपवर मेसेज आला. त्यानंतर महिलेने संबंधित व्यक्तीला कॉल करून तुम्ही कोण आहात माझा नंबर कोणी दिला अशी विचारणा केली. मात्र समोरून काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांनंतर काही मिनिटात त्याच नंबर वरुन व्हिडिओ कॉल आला. ते पाहून महिलेने तो कॉल उचलला. तेव्हा तो कॉल अश्लील असल्याचं दिसलं. ते पाहून महिला घाबरली आणि तिने थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. महिलेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका

एखाद्या व्यक्तीला अनोळख्या नंबर वरुन अश्लील व्हिडिओ कॉल आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरुन सांगवी पोलिसांनी महिलांना एक आवाहन केले आहे. एखाद्या अनोळखी नंबर वरुन व्हिडिओ कॉल उचलू नका असे आवहान सांगवी पोलिसांनी महिलांना केले आहे.


वाचा – डॉक्टर महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपीस अटक

वाचा – अश्लील फोटो आणि व्हिडीओद्वारे प्रेयसीची बदनामी;प्रियकराला अटक

First Published on: November 19, 2018 3:54 PM
Exit mobile version