मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या NSUIच्या कार्यकर्त्यांना मारहाण

मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या NSUIच्या कार्यकर्त्यांना मारहाण

एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची मारहाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडिअमवर नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेला जात असताना मोदींच्या ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.


हेही वाचा – सोलापूर दौरा; मोदींनी फुंकले लोकसभेचं रणशिंग


एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा सभास्थळी जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेडे दाखवत चौकीदार चोर है च्या घोषणाबाजी केल्या. या तरुणांना अडवत पोलिसांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत अटक केली. पोलिसांनी एनएसयूआयचा जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिध्दराम सगरे या कार्यकर्त्यांना मारहाण केली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने निषेध केला आहे.

First Published on: January 9, 2019 9:54 PM
Exit mobile version