बालाजीच्या दर्शनाला जाताना अपघात; तीन जणांचा मृत्यू

बालाजीच्या दर्शनाला जाताना अपघात; तीन जणांचा मृत्यू

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. तेलंगणात झालेल्या जीपच्या भीषण अपघातात तीन भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असून दोन बालकांसह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तेलंगणातील वनपरती जिल्ह्यातील कोत्ताकोटाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघाता झाला आहे. या अपघातात सपना राजू कुनी (२५), शारदा कुनी (५०) आणि दत्तात्रय धुळम (४५) या तिघांना आपल्या जीव गमवावा लागला आहे. तर कृष्णाहरी कुनी, यल्लप्पा कुनी, शैलेश धुळम, श्रेयस धुळम, कृष्णा कुनी, राजू कुनी, भक्ती कुनी हे सात जण अपघातात जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

सोलापुरातील पूर्व भागात राहणारे धुळम आणि घरकुल परिसरात रहाणारे कुनी कुटुंबातील सदस्य तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, कोत्ताकोटा भागात गेल्यानंतर चालकाचा गाडीवरली ताबा सुटला आणि गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकली आणि अपघात झाला. अपघातातील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढून हैदराबाद आणि मेहबूब नगरला उपचारासाठी पाठवले आहे. या अपघाताची नोंद तेलगंणातील कोत्ताकोटा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.


हेही वाचा – पुणे : संतापलेल्या मुलांने केला पित्याचा खून


 

First Published on: February 17, 2020 11:51 AM
Exit mobile version