मध्य रेल्वेवर ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष गाडी, पहा संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेवर ‘या’ स्थानकांदरम्यान विशेष गाडी, पहा संपूर्ण वेळापत्रक

central railway

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायाल मिळत आहे.  प्रवाशांची होत असलेली अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हडपसर ते हजूर साहिब नांदेड अशी एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  या गाडीचे संपर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

01329 एकेरी विशेष गाडी २ जानेवारी २०२२ रोजी २३.३० वाजता हडपसर येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १३.१५ वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल.  दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा या ठिकाणी ही गाडी थांबेल.  १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी अशी गाडीची आसन व्यवस्था असणार आहे.

01329 वन वे विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह ३१ डिसेंबर २०२१  पासून बुकींग सुरू होणार आहे.  सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर तुम्ही तिकीट बुक करू शकता.  फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार आहे.


हेही वाचा – India Post : मतदारांना आता घरपोच मिळणार ओळखपत्र, ECI – भारतीय पोस्टात करार

First Published on: December 30, 2021 9:29 PM
Exit mobile version