घरताज्या घडामोडीIndia Post : मतदारांना आता घरपोच मिळणार ओळखपत्र, ECI - भारतीय पोस्टात...

India Post : मतदारांना आता घरपोच मिळणार ओळखपत्र, ECI – भारतीय पोस्टात करार

Subscribe

भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि भारतीय पोस्ट विभागामध्ये झालेल्या करारान्वये सुरूवातीच्या टप्प्यात पोस्टाच्या विभागाक़डून ६ कोटी ते ७ कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक ओळखपत्र (ECI) घरपोच पोहचवणार आहे. त्यामुळे पोस्टाला १०० कोटी रूपयांचा महसूल या पहिल्या टप्प्यात मिळणार आहे.

भारतीय डाक विभाग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच एक महत्वाचा करार केला आहे. या करारान्वये पोस्टाच्या माध्यमातून मतदारांना मतदान ओळखपत्र घरपोच देण्यात येणार आहे. स्पीड पोस्टाच्या माध्यमातून मतदारांना हे ओळखपत्र घरपोच देण्यासाठीचा करार दोन विभागांमध्ये झाला आहे. विविध टप्प्याअंतर्गत ही ओळखपत्रे घरपोच देण्यात येणार आहेत. या करारान्वये पोस्टालाही कोट्यावधी रूपयांचा महसूल मिळणार आहे.

भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि भारतीय पोस्ट विभागामध्ये झालेल्या करारान्वये सुरूवातीच्या टप्प्यात पोस्टाच्या विभागाक़डून ६ कोटी ते ७ कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक ओळखपत्र (ECI) घरपोच पोहचवणार आहे. त्यामुळे पोस्टाला १०० कोटी रूपयांचा महसूल या पहिल्या टप्प्यात मिळणार आहे.

- Advertisement -

पोस्टाच्या माध्यमातून देशात १५० वर्षांहून अधिक कालावधीपासून देशात सेवा दिली जात आहे. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात पोस्टाने महत्वाची सेवा दिली आहे. तसेच नागरिकांच्या दैनंदिन थेट आय़ुष्याशी पोस्टाचा विभाग जोडला गेला आहे. त्यामध्ये टपाल पोहचवण्यापासून ते छोट्या बचत योजना स्विकार करणे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक जीवन विमा या माध्यमातून जीवन विमा कव्हर उपलब्ध करून देणे, देयकांचा भरणे करणे, फॉर्मची विक्री करणे यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश हा पोस्टाच्या सेवांमध्ये आहे.

भारतीय पोस्टाचा विभाग हा केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) मध्ये मजुरीचे वितरण आणि जेष्ठ नागरिकांच्या पेन्शनसारख्या अनेक योजनांमध्ये भारत सरकारचा एजंट म्हणून काम करते. त्यामध्येच आता निवडणूक आयोगाच्या सेवेचाही समावेश आहे. या सेवेच्या माध्यमातून पोस्टाच्या विभागाकडून मतदार ओळखपत्र आता घरोघरी पोहचवण्याचे काम पोस्टाकडून करण्यात येणार आहे. तसाच करार पोस्टाच्या विभागामध्ये आणि केंद्रीय निवडणूक आयोगात झाला आहे.

- Advertisement -

भारतीय पोस्टाच्या माध्यमातून देशात १.५६ लाख पोस्ट ऑफिसेसमध्ये २९ कोटी २९ लाखांहून अधिक सक्रीय डाक घर बचत बॅंकेतील खात्यांचे संचलन करतो. या खात्यामध्ये १२ लाख ५६ हजार ७३ कोटी रूपयांचा ठेव आहे. यंदाच्या वर्षात १.६७ कोटी नवीन खाती उघडली गेली. तर ४.७१ लाख रूपये या खात्यांमध्ये जमा केले गेले. कोअर बॅंकिंग सेवेच्या माध्यमातून ८.१९ लाख कोटी रूपयांचे व्यवहार झाले. तर ५१.४५ लाख नवीन खाती ही सीबीएस डाकघरांमध्ये उगडली गेली. या पोस्टाच्या योजनांमध्ये १ लाख २२ हजार ८५१ कोटी रूपयांची रक्कम जमा केली गेली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -