कोल्हापूरात एसटीला भीषण अपघात

कोल्हापूरात एसटीला भीषण अपघात

(फोटो सौजन्य : लोकसत्ता)

कोल्हापूर जिल्ह्यात दोन एसटीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, १२ प्रवासी जखमी झाले. सकाळी ९ वाजता कोल्हापूर – गगनबावडा या रोडवर हा अपघात झाला.

अपघात कसा घडला?

कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर दोन्ही बाजूने एसटी येत असताना त्या एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. विरुध्द दिशेने जाणाऱ्या दोन एसटी बसची कोल्हापूर – गगनबावडा रोडवर समोरा समोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १२ प्रवासी जखमी झाले. कोल्हापूरात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे समोर येणारी एसटी न दिसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जखमींवर उपचार सुरु 

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मृत्यू झालेल्या ६२ वर्षाच्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातानंतर दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर दोन्ही एसटीला रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आले आहे. सध्या दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.

First Published on: July 13, 2018 2:03 PM
Exit mobile version