एसटीने ड्रायव्हर्स धाडले वारीला, म्हणे ५ दिवसांची न्या शिदोरी!

एसटीने ड्रायव्हर्स धाडले वारीला, म्हणे ५ दिवसांची  न्या शिदोरी!

प्रातिनिधिक छायाचित्र

आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. मालवाहतूक बसेसच्या चालकांना एसटी महामंडळाने कर्तव्यावर जाताना तब्बल पाच दिवस पुरेल इतके जेवण सोबत बाळगण्याच्या अजब सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात पाच दिवसाचे जेवण सोबत बाळगायचे कसे असा मोठा प्रश्न एसटी कर्मचार्यांना समोर पडला आहे. या सुचनेला कर्मचार्यांकडून विरोध केला आहे.

परिपत्रक तात्काळ केले रद्द

राज्य परिवहन महामंडळामार्फत मालवाहतूक सुरु करण्यात आली असून त्यानुसार मालवाहतुकीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व चालकांनी आपल्या पुरेल इतके पाच दिवसांचे जेवण घेऊनच कर्तव्यावर जाणे, कारण मालवाहतुकीसाठी गेलेला एसटी त्वरित परत येईल याची शक्यता खुप कमी असते. त्यामुळे कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्तव्यांवर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचे जेवण सोबतच घेऊनच कर्तव्यावर यावे अशी सूचना राज्य परिवहन महामंडळाचे पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांच्या सुचनेचं परिपत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क केला असताना, त्यांनी सांगितले की, कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता असते. तसेच मालवाहतुकीसाठी गेलेली एसटी त्वरित परत येईल यांची शक्यता कमी असल्याने या सुचना काढण्यात आलेल्या होत्या. मात्र आता सुचनेचं परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी नविन सुचना लावण्यात आले आहे.

चालकांना सुविधा द्यावात

पुणे, नाशिक, सातारा, सांगली,जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीची मालवाहतुक दिवसेंदिवस वाढत आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना सर्व सोयीसुविधा वाहन मालक देते. त्यामुळे त्यांच धर्तीवर एसटी महामंडळाने सुध्दा अभ्यास करुन मालवाहतूक करणाऱ्या एसटी चालकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

एसटी कर्मचाऱ्यांना पांच दिवसाचे जेवण घेऊन कर्तव्यावर जाण्याच्या सूचना देणे हे अत्यंत्य हास्यास्पद आहे. आगार व्यस्थापकांनी अशा सुचना देऊन एसटी कामगाराची थट्टा केली आहे. महामंडळांनी मालवाहतूक करणार्या एसटी कर्मचाऱ्यांची  सोय करणे गरजेचे आहे.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस
First Published on: July 14, 2020 6:56 PM
Exit mobile version