‘या’ सुपरहिरोंमुळे लालपरी सुरळीत धावते

‘या’ सुपरहिरोंमुळे लालपरी सुरळीत धावते

'या' सुपरहिरोंमुळे लालपरी सुरळीत धावते

कोरोनांमुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून एसटी सेवा पुरविण्यात येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एसटीचा प्रवास सुरक्षित आणि कोरोनाची कोणतीहीबाधा होऊन नये, यासाठी एसटीचे दोन कर्मचारी आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता बस गाड्यांच्या मेंटेनेस पासून ते गाडी स्वच्छ करण्यापर्यंत रात्रंदिवस काम करत आहेत. मुंबई सेंट्रल आगारात हे दोनच कर्मचारी काम करत असल्यामुळे एसटी महामंडळात या दोन सुपरहिरोचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक व्यस्था बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या तीनही विभागातून एकूण ३५० एसटी बसेस धावत आहेत. मात्र, या बसेसच्या दररोजच्या देखभाली आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, कोरोनामुळे सार्वजनीक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या आठ दिवसात कामावर उपस्थित राहता आले नाही.

सुरक्षितेसह आरोग्यदायी प्रवासासाठी धडपड

इतकेच नव्हे तर एसटी बस गाड्या धुण्याऱ्या कंत्राटी कामगारांना देखील डेपोत येता आले नाही. त्यामुळे एसटी महामंडळासमोर मोठे संकट उभे होते. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवास व्हावा, यासाठी मुंबई सेंट्रल डेपोच्या कार्यशाळेत दोन सहाय्यक कारागीर (यांत्रिक) यांनी ही सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. एसटी गाड्यांच्या मेंटेनेस पासून ते एसटी धुण्याचे काम करत आहेत. या कामगारांचे नाव दीपक खाशाबा जगदाळे आणि सुखदेव बाळू सांगळे असून हे दोघेही सहाय्यक कारागीर (यांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. या दोन कर्मचारी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आज काम करत आहे.

फक्त दोन कर्मचारी देतात सेवा

मुंबई सेंट्रल आगारातून दररोज अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी एकूण १० गाड्या धावत आहेत. मुंबई सेंटर आगारातील एसटीच्या कार्यशाळेमध्ये एकूण ५७ कर्मचारी आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकल सेवा बंद असल्याने कर्मचारी कामावर येऊ शकले नाहीत. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गाडी उपलब्ध करून देण्याचे काम सुखदेव आणि दीपक करत आहेत. इतकेच नव्हे तर गाड्याचे मेंटेनन्स आणि बस गाड्या धुण्याचे काम सुद्धा हे दोघे दररोजच सकाळ पासून ते उशिरा रात्रीपर्यंत करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! लॉकडाऊन अखेरीस कोरोनाची संख्या १० हजार पर्यंत जाणार


 

First Published on: April 2, 2020 8:48 PM
Exit mobile version