एसटीसाठी कर्मचाऱ्यांनीच फिरवली भाकर!

एसटीसाठी कर्मचाऱ्यांनीच फिरवली भाकर!

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. शासन आदेशान्वये बिगर रेड झोन मध्ये एसटी महामंडळाची अंशतःवाहतूक सुरू असली तरी महामंडळाचे दररोज रुपये २३ कोटी इतके उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल खर्च भागविणे एसटी महामंडळाला कठीण झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी एसटी कामगार संघटनेनी केली आहे.

एसटी महामंडळाला करावे आर्थिक साहाय्य

राज्य शासनाने सवलत मूल्या पोटी प्रतिपूर्तीची रक्कम दिल्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना  मार्चचे ७५%  एप्रिलचे १००% व  मेचे ५०% वेतन देण्यात आले. उर्वरित वेतन अद्याप प्रलंबित असून जून महिन्याचे वेतन जुलै २०२०चे वेतन वाटपास येणारी आर्थिक अडचण दूर करून पूर्ण वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे.  लॉकडाऊन मुळे संपूर्ण देश आर्थिक अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी देशातील उत्तर प्रदेश,कर्नाटक व तेलंगणा राज्यात तेथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तेथील शासनाने आर्थिक साहाय्य केल्याचे समजते राज्यात एसटी महामंडळ हे सर्वसामान्य जनतेला प्रवासाची सुविधा देत असून राज्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग एसटी आहे. त्यामुळे तिला आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे आवश्यक आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित २५% व ५०% वेतन तसेच माहे जून देय जुलै २०२० चे पूर्ण वेतन मिळण्यासाठी  देशातील इतर राज्यांप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी अशी मागणी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविले आहे.

सध्या एसटी कर्मचारी आर्थिक दृष्ट्या खूप अडचणीत आलेला आहे. तरीही जिवाची बाजी लावून कोविड संकटात आपली सेवा देत आहे. मात्र मार्च महिण्याचे उर्वरीत २५% वेतन मुंबई ठाण्या चे एप्रिलचे वेतन व मे महीन्याचे  ५०% मिळालेले नाही व जून महीन्याचे वेतन मिळणे अद्याप बाकी आहे. ते त्वरित मिळणे आवश्यक आहे. पुढच्या काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन करावयाचे असल्याने अजून तोटा वाढणार आहे, म्हणून एसटी महामंडळाला तातडीची मदत दोन हजार कोटी मिळावी अशीही विनंती मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे. मात्र भविष्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्यशासनात होणे आवश्यक आहे. -संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना  

First Published on: July 3, 2020 4:59 PM
Exit mobile version