१ मार्च ते २८ मार्च पर्यंत होणार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन?

१ मार्च ते २८ मार्च पर्यंत होणार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जाहीर झाला आहे. १ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून २८ मार्च पर्यंत अधिवेशन असणार आहे. मात्र, २५ फेब्रुवारीला कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी किती ठेवणार याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, ८ मार्चला अर्थसकंल्प सादर केला जाणार आहे. कोरोनामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता आहे.

कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठक पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधला. १ मार्च ते ८ मार्च या कालावधीतील कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली आहे. २५ फेब्रुवारीला पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चार आठवड्यांचं अधिवेशन झालं पाहिजे, अशी मागणी केली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी करुन नये. हे अधिवेशन चार आठवड्यांचं असायला हवं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा –  लोकांच्या प्रश्नांसाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे – फडणवीस


 

First Published on: February 18, 2021 4:58 PM
Exit mobile version