घरताज्या घडामोडीलोकांच्या प्रश्नांसाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे - फडणवीस

लोकांच्या प्रश्नांसाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे – फडणवीस

Subscribe

कोरोना रुग्णांचे आकडे अधिवेशन आल्यामुळे वाढेलत असे नाही आहे. पण कोरोना काळात लोकसभेचं अधिवेशन नीट चालत त्यांनी त्यांचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. दुसरा टप्पा ८ तारखेला ते पूर्ण करणार आहेत. आपलं आणि त्यांचं अधिवेशन एकाच वेळी चालणार आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सभागृह घेतलं नाही तर हे मांडायचं कुठे?

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समोर येत असतात. काही उपाययोजना होत असतात. आज वीजेच्या संदर्भात भयानक परिस्थिती आहे. ७५ लाख लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. सर्रास लोकांचं कनेक्शन कापलं जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे वीज कनेक्शन कापणं हे यापूर्वी आपणं कधीही पाहिलं नाही. जर सभागृह घेतलं नाही तर हे मांडायचं कुठे? त्यामुळे पूर्ण ४ आठवड्याचं अधिवेशन केलं पाहिजे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

‘आता सरकारने अधिवेशनाचा कालावधी गुलदस्त्यात ठेवला आहे, त्यामुळे पुन्हा बीएससी घेऊन असं त्यांचं चाललं आहे. पण त्यांनी कालावधी कमी केला तर प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी हे करतायत असाच त्याचा अर्थ होणार आहे. केंद्र सरकारमध्ये रोज चर्चा होत असतात. जितके दिवस पाहिजे तितके दिवस चर्चा होत असतात. आझाद मैदानावर इतके दिवस शिक्षक बसले आहेत, कुठे चर्चा आहेत? त्यामुळे या सरकारचं धोरण आहे, पाहिजे तेवढं आंदोलन करा, आम्ही लक्ष्यच देणार नाही,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.


हेही वाचा – राज्य सरकारच्या संवेदना बधिर झाल्यात, फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -