मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील अंमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील अंमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन, काँग्रेसकडून चौकशीची  मागणी

मुंबई – मुंबईतील झोपडपट्टी परिसरात अंमली पदार्थांचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी देशाचे भविष्य आहे. अंमली पदार्थांच्या फैलावाने देशाचे भविष्य उद्धवस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा-आकांक्षाही उद्ध्वस्त  होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुलेही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरू असलेला हा अंमली पदार्थांचा फैलाव थांबवावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमवारी केली.

हेही वाचा मोठी बातमी! बीडीडी चाळ परिसरातील झोपडपट्टीधारकांना मिळणार ३०० चौ. फुटांचे घर

कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला बरोबर घेऊन सचिन सावंत यांनी आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पोईसर परिसरात नागरी संस्थांनी घेतलेले सह्यांचे अभियान आणि जनमानसाचा प्रतिसाद जैन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. सदर प्रकार हा अतिशय गंभीर असून पोलिस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून अंमली पदार्थांचे रॅकेट खणून काढतील, असे आश्वासन जैन यांनी शिष्टमंडळाला  दिले.

हेही वाचा पोलीस भरती : उत्तेजक औषधे घेण्याच्या प्रकरणात वाढ, पोलीस सतर्क

अंमली पदार्थ विरोधी नियंत्रण विभाग केवळ ड्रग्स घेणाऱ्यांच्या मागे गेले काही महिने दिसला. मात्र अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना पकडले जात नाहीत, याची खंत सावंत यांनी व्यक्त केली. लवकरच प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे या मागणीसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सावंत म्हणाले. दरम्यान या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राणा सिंह, मुंबई काँग्रेसचे सचिव आनंद राय, आर. पी. पांडे, रत्नाकर सिंह, सुनील तिवारी, राकेश झा आणि काही नागरी संस्थांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

First Published on: January 9, 2023 10:15 PM
Exit mobile version