शहरात आजपासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत कडक जनता कर्फ्यू

शहरात आजपासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत कडक जनता कर्फ्यू

कोरोना विषाणू

नाशिकlकरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात आजपासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास पुर्णत: मज्जाव करण्यात आला आहे. पालकमंत्री व प्रशासनाच्या बैठकीत कडक जनता कर्फ्यू करण्यातबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात ४ हजारहून अधिक रूग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली आहे. ज्या भागात वाहतूककोंडी तो परिसर नो व्हेहीकल झोन घोषित केला जाणार आहे. तसेच खासगी रूग्णालयांमधून रूग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रत्येक खासगी रूग्णालयात महापालिकेचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, खासगी रूग्णालयांमधील खाटा महापालिका आयुक्त आरक्षित करणार आहेत.

First Published on: June 30, 2020 2:07 PM
Exit mobile version