ठाकरे सरकार बरखास्त नाही केलं तर नाव बदला, सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारला इशारा

ठाकरे सरकार बरखास्त नाही केलं तर नाव बदला, सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारला इशारा

ठाकरे सरकार बरखास्त नाही केलं तर नाव बदला, सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारला इशारा

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवशेनात विद्यापीठ सुधारणा विधेयके कायदा मंजूरीवरुन शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. या विधेयकावरुन भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकार बरखास्त केल नाही तर नाव बदला असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयके मंजूरीसाठी आणले गेले. यावर विरोधकांनी सुरुवातीला चर्चा करताना राज्य सरकारवर निशाणा साधला होता. सत्ताधाऱ्यांनी अधिवेशन रेटून नेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

विद्यापीठ सुधारणा विधेयकावर सरकारने चर्चा न करता मंजूर केल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. एवढी बदमाशी आली आहे का?, कोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल असा इशारा देखील मुनगंटीवार यांनी दिला आहे. यावेळी सरकार बरखास्त नाही केलं तर नाव बदला असेही मुनगंटीवार म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील बोलण्यासाठी उभे होते. मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी झाली होती.

ठाकरे सरकारने लोकशाहीच्या परंपरा मोडल्या

विधानसभेत मुख्य स्थानावर उपस्थित न राहता कृती करण्याचे आदेश व्हायचे ते पाहिले आहे. या राज्यात २३ विद्यापीठे त्यातील १८ विद्यापीठ traditional शिक्षण देणारे आहेत तसेच १ महिलांचे विद्यापीठ आहे. याबाबत चिंतन मंथन व्हावे परंतु सरकार ऐकायला तयार नाही. सरकारने लोकशाहीच्या सर्व परंपरा मोडीस काढायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला मध्येच थांबवून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या कामकाजाला बंद पाडण्यामध्ये पुढाकार घेतला असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आमच्याविरुद्ध बोलणाऱ्यांना अटक करु अशी राज्य सरकारची भूमिका आहे. राज्यात आतंक आहे, दहशत आहे. घटनात्मक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे भाजपने निर्णय केला आहे की, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि या सरकारच्या विरोधात एल्गार करणार आहोत. यामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.


हेही वाचा : विद्यापीठ कायद्यातील बदलावरुन ठाकरे सरकारविरोधात एल्गार, मुनगंटीवारांकडून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

First Published on: December 29, 2021 3:32 PM
Exit mobile version