घरताज्या घडामोडीविद्यापीठ कायद्यातील बदलावरुन ठाकरे सरकारविरोधात एल्गार, मुनगंटीवारांकडून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

विद्यापीठ कायद्यातील बदलावरुन ठाकरे सरकारविरोधात एल्गार, मुनगंटीवारांकडून जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

Subscribe

विद्यापीठ कायद्यात बदल केल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णय़ावरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. तसेच राज्य सरकारविरोधात महाराष्ट्रात एल्गार करणार असून राज्यातील नागरिकांनी या एल्गारला पाठिंबा द्यावा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारचा जनतेला खरा चेहरा दिसला असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर घणाघात केला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चर्चा करताना मधीच थांबवण्यात आले, असे एक लोकशाहीचा आतंक काल विधानसभेत पाहिला. सत्तेची मस्ती, अहंकार आणि दुरुपयोग पाहिला. मीच ठरवेल ते धोरण आणि मीच बांधेल ते तोरण असा प्रकार पाहिला आहे. या भावनेने काम करणारे सरकार पाहिले आहे. इथे या सरकारची कृती थांबत नाही आतापर्यंत साधारणता ९८ वेळा घटनाबाह्य कृती या सरकारने केली आहे. कधी मंत्रिमंडळाच्या पवित्र व्यासपीठाचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीत दुसऱ्या राज्यातील घटनेसंदर्भात दोन मिनीट मौन पाळायचे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. महिलांवर केलेले कृत्या त्यातून महिलांचा होणारा मृत्यू यावर एकही शब्द काढला नाही असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारविरोधात एल्गार करणार

विधानसभेत मुख्य स्थानावर उपस्थित न राहता कृती करण्याचे आदेश व्हायचे ते पाहिले आहे. या राज्यात २३ विद्यापीठे त्यातील १८ विद्यापीठ traditional शिक्षण देणारे आहेत तसेच १ महिलांचे विद्यापीठ आहे. याबाबत चिंतन मंथन व्हावे परंतु सरकार ऐकायला तयार नाही. सरकारने लोकशाहीच्या सर्व परंपरा मोडीस काढायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला मध्येच थांबवून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या कामकाजाला बंद पाडण्यामध्ये पुढाकार घेतला असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आमच्याविरुद्ध बोलणाऱ्यांना अटक करु अशी राज्य सरकारची भूमिका आहे. राज्यात आतंक आहे, दहशत आहे. घटनात्मक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे भाजपने निर्णय केला आहे की, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि या सरकारच्या विरोधात एल्गार करणार आहोत. यामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री ठाकरेंनी विक्रम मोडीत काढला

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्यपाल घटनेनुसार राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. या राज्याच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यातील व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतात की नाही याची पडताळणी करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपालांच्या संदर्भात घटनाबाह्य शब्दांचा उपयोग करायचा या सरकारची कृती घटनाबाह्य आहे. काल अतिरेक केला आहे. अनेक सरकार पहिले २७ वर्षात, अनेक मुख्यमंत्री पाहिले, १ मे १९५९ पासून अधिवेशनात मुख्यमंत्री नाहीत असे एखादे अधिवेशन असेल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा रेकॉर्ड मोडला असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


हेही वाचा : तुमचं पत्र अपमान आणि धमकावणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचं सडेतोड उत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -