शरद पवारांचा साखर कारखान्यांना सल्ला; म्हणाले, ‘इथेनॉलसह CNG…

शरद पवारांचा साखर कारखान्यांना सल्ला; म्हणाले, ‘इथेनॉलसह CNG…

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील मांजरी येथे पार पडलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत. भविष्यात साखर कारखान्यांना सक्षम करण्यासाठी सारखे व्यतिरिक्त इतर उपपदार्थांवर लक्ष केंद्रीत करावं लागणार असल्याचं मत शरद पवार यांनी मांडत कारखान्यांना सीएन आणि हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्या देशात साखरेचं उत्पादन मोठ्याप्रमाणात होत आहे. मागणीपेक्षा साखर उत्पादित केली जात आहे. त्यामुळे साखरेला म्हणावा तसा दर मिळत नाही. याचा आर्थिक ताण साखर कारखान्यांना सहन करावा लागतोय. यामुळे अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे करावा असा सल्लाही त्यांनी कारखान्यांना दिला आहे. यासह ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या जातीच्या बेण्याचा वापर करणं गरजेचं आहे. यासाठी साखर कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

साखर कारखान्यांनी इथेनॉलप्रमाणे सीएनजी आणि हायड्रोजन वापराकडे लक्ष द्यायला हवे. सध्या डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजीवर चालणारी वाहन अधिक मायलेज देतात. त्यामुळे सीएनजी हे प्रभावी इंधन ठरतेय. म्हणून साखर कारखान्यांनी त्याचा विचार करायला हवा, असा सल्लाही पवार यांनी कारखान्यांना दिला आहे.

राज्यातील साखर उत्पादनावर बोलताना पवार म्हणाले की, यंदाचा गळीप हंगाम 191 दश लक्ष टनवर जाईल असा अंदाज आहे आणि हा जागतिक उच्चांक होणार आहे. मागील वर्षी 185 दशलक्ष टन ऊसाचं गाळप झालं. मागील वरर्षी महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरचं उत्पादन केलं आहे. यामुळे महाराष्ट्र साखरेच्या उत्पादनात देशातील प्रथम क्रमांक पटकावणारे राज्य आहे, अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे.

राज्यात ऊसासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उभारणार VSI केंद्र

राज्यातील सगळ्या भागात ऊसाचं उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट केंद्र उभारलं जाणार आहे. सध्या जालनात एक केंद्र आहे. लवकरचं नागपूर आणि अमरावतीमध्ये VSI केंद्र उभारले जाईल, तसेच पुढच्या काळात खानदेशातही VSI केंद्र उभारण्याचा उद्देश असल्याचं शरद पवार यांनी नमूद केले.


एक व्यक्ती एक कार; सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली जनहित याचिका

First Published on: January 21, 2023 2:19 PM
Exit mobile version