फडणवीस म्हणाले सेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक, विक्रम गोखलेंच्या दाव्यावर सुनील प्रभू यांची रोखठोक भूमिका

फडणवीस म्हणाले सेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक, विक्रम गोखलेंच्या दाव्यावर सुनील प्रभू यांची रोखठोक भूमिका

भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली नाही. त्याबाबत मी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी फडणवीसांना केला. त्यावर त्यांनी उत्तर देताना चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला होता. यावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. शिवसेनेत चुकीला माफी नाही, असं सुनील प्रभू म्हणाले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने सुनील प्रभू बाळासाहेब ठाकरे यांना अभिबदन करण्यासाठी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आले होते. यावेळी त्यांना विक्रम गोखले यांनी फडणवीस यांच्याबाबत केलेल्या दाव्यासंदर्भात विचारण्यात आलं असता, त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “बाळासाहेब ठाकरे यांचा ९ वा स्मृतिदिन आहे. शिवसेना मोठ्या वेगळ्या वातावरणामध्ये वाढली. बाळासाहेबांच्या शिकवणीत शिवसेना वाढली. शिवसेनेत चुकीला माफी नाही,” असं सुनील प्रभू म्हणाले.

सेना-भाजप युतीचा मध्यस्थी करणारे विक्रम गोखले कोण? – राऊत

अभिनेते  विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी मध्यस्थी करायला तयार आहे, असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना-भाजप युती करण्यासाठी ते मध्यस्थी करणारे कोण? असा सवाल करत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी क्रांतिकारकांचा अपमान केलाय, अशा व्यक्तींची माध्यस्थीसाठी गरज नाही, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.


हेही वाचा: महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात टीका करण्याचे सुनियोजित षडयंत्र, मलिकांचा आरोप


 

First Published on: November 17, 2021 1:34 PM
Exit mobile version