राज्याची विधानसभा कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्याची विधानसभा कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर दिले. उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली. ‘हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे. (supriya sule on eknath shinde speech comedy maharashtra budget session)

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरला. पहिल्या आठवड्यात राज्यपाल रमेश बैस यांनी केलेल्या भाषणावर विरोधकांनी आक्रमक प्रत्युत्तर देत चर्चा केली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचे समर्थन करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. “मुख्यमंत्री अधिवेशनात महागाईशी संबंधित विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण टीका आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच त्यांनी वेळ घालवला”, असा खोचक टोला लगावला.

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळाली नाही असे झाले नाही. कोरोना काळात कोणी उपाशी झोपले नाही. इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारू बंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसू’, असा इशाराही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिला.

दरम्यान, विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली.


हेही वाचा – औरंगाबाद समर्थनार्थ MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे पोस्टर, नव्या वादाला सुरुवात

First Published on: March 4, 2023 6:21 PM
Exit mobile version