स्वराज्यचे उमेदवार सुरेश पवार ‘डार्क हॉर्स’ : युवराज संभाजीराजे

स्वराज्यचे उमेदवार सुरेश पवार ‘डार्क हॉर्स’ : युवराज संभाजीराजे

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेच्या मेळाव्यामध्ये बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पुरस्कृत उमेदवार सुरेश पवार यांना डार्क हाऊस अशी उपमा दिली आहे. या निवडणुकीमध्ये एका बाजूला प्रस्थापित तर दुसऱ्या बाजूला तीन पक्षांचा पाठिंबा असलेल्या बलाढ्य अशा उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांना सुरेश पवार हे पराभूत करतील. आणि विजयी होतील असा विश्वास यावेळी बोलताना संभाजी राजेंनी व्यक्त केला.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अतिशय रंजक पद्धतीने घडामोडी घडवून आता निवडणूक शेवटच्या टप्प्याकडे येऊ ठेपली आहे. सोमवारी (दि.३०) यासाठी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी आज शनिवार (दि.२८) रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्याच पार्श्वभूमीवर आज स्वराज्य संघटनेचा पदाधिकारी नियुक्ती व कार्यकर्ता मेळावा नाशिक मधील नांदूर नाका परिसरातील संजीवनी लॉन्स या ठिकाणी पार पडला. यावेळी बोलत असताना युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छ राजकारणासाठी पर्याय म्हणून जनता आता स्वराज्याकडे बघत आहे असे प्रतिपादन केले. तसेच येणाऱ्या काळात नक्कीच एक चांगला राजकीय पर्याय स्वराज्याच्या माध्यमातून निर्माण होईल असा विश्वासही व्यक्त केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेने सुरेश पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. एका बाजूला प्रस्थापित तर दुसऱ्या बाजूला तीन पक्षांचा पाठिंबा असलेले बलाढ्य उमेदवार आहेत. मात्र, ज्या पद्धतीने घोड्यांच्या रेस मध्ये जो घोडा काहीसा कमजोर समजला जातो परंतु शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तोच घोडा बाजी अशा घोड्याला या हॉर्स रेसमध्ये डार्क हॉर्स म्हणून संबोधले जाते. अशाच पद्धतीने स्वराज्याचे पुरस्कृत उमेदवार सुरेश पवार हे देखील नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये डार्क हॉर्स ठरतील व स्वराज्याची विजयी पताका फडकवतील असा विश्वास यावेळी बोलताना संभाजी राजे यांनी व्यक्त केला.

First Published on: January 28, 2023 6:13 PM
Exit mobile version