पुणे : स्वारगेट – ठाणे बसला भीषण आग, प्रवासी सुखरुप

पुणे : स्वारगेट – ठाणे बसला भीषण आग, प्रवासी सुखरुप

स्वारगेट - ठाणे बस आगीत जळून खाक

मुंबई – बंगलोर महामार्गावरील एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ही आग लागल्यामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; बावधन परिसरात अचानक एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी मात्र, बस या आगीत पूर्ण जळून खाक झाली आहे. दुर्घटनाग्रस्त बसमध्ये ३५ प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे. आग विझल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.


हेही वाचा – हॉटेलमध्ये धिंगाणा घालणारा पोलीस निलंबित


 

First Published on: February 4, 2020 7:42 PM
Exit mobile version