शाळकरी मुलीची छेड; रोड-रोमियोला कपडे फाटेपर्यंत मिळाला प्रसाद

शाळकरी मुलीची छेड; रोड-रोमियोला कपडे फाटेपर्यंत मिळाला प्रसाद

नाशिक : शहरतील पाथर्डी फाटा परिसरातील एक्स्प्रेस इन हॉटेलजवळ एका शाळकरी मुलीची घेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. एका इसमाने शाळेतून घराच्या दिशेने जात असलेल्या दोन शाळकरी मुलींना अडवून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरू असल्याने त्यातील एका मुलीने तेथून पळ काढत कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. मुलींच्या कुटुंबियांनी घटनास्थळ गाठत छेड काढणार्‍या इसमाला चांगलाच चोप दिला. सर्व प्रकार मुख्य रस्त्यावर सुरू असल्याने रस्त्यावरून जाणार्‍या इतर नागरिकांनीही चांगलाच हात साफ करून घेतला. दरम्यान, इंदिरा नगर पोलिसांनी या रोडरोमिओला ताब्यात घेतले आहे.

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. खून, मारामारी, चोरी, लूटमार, जीवघेणे हल्ले यांचे प्रमाण वाढलेले असतानाच मागील काही दिवसात महिला आणि तरुणींच्या छेदछाडीच्या घटनाही समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता थेट शाळकरी मुली टवाळखोरांच लक्ष होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहणार्‍या मुली पांडवलेणीच्या दिशेने जाणार्‍या मार्गावरून शाळेत ये-जा करत असते. अशातच शाळा सुटल्यानंतर मुलगी घराच्या दिशेने जात असतांना एक्सप्रेस इन हॉटेल जवळील परिसरात एका इसम वारंवार मुलीची छेड काढल होता, मात्र ही घटना वारंवार घडत असल्याने शनिवारी (फी.१९) त्यातील एका मुलीने त्यांच्या पालकांना याबाबत सांगितले. पालकांनी यावर तातडीने परिसरात संबंधित व्यक्तीचा शोध घेतली. त्यांना टवाळखोर इसम त्याच ठिकाणी आढळून आला. त्याला छेडछाडी बाबत विचारणा केल्यावर त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान ही सगळी घटना भररस्त्यात घडत असल्याने रस्त्यावरून येणारे-जाणारे तसेच परिसरातील नागरिकांनीही चांगलाच हात साफ करून देत अक्षरश कपडे फाटेपर्यंत चोप दिला. या सर्व घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत छेड काढणार्‍या टवाळखोराला ताब्यात घेतले.

निर्भया पथक कुठे आहे ?

महिलांवरील अत्याचार, छेडछाड अश्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेत त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ‘निर्भया’ पथक निर्माण करण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत शहरात वाढलेल्या छेडछाड, महिला विरोधी गुन्ह्याची संख्या तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात वाढलेला टवाळखोरांचा वावर यापार्श्वभूमीवर निर्भया पथकाच नेमक काय करतय? निर्भया पथक आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First Published on: November 19, 2022 8:31 PM
Exit mobile version