Mahad Heat News : महाडकरांचा ‘ताप’ वाढला, पारा थेट 42 अंशांवर

Mahad Heat News : महाडकरांचा ‘ताप’ वाढला, पारा थेट 42 अंशांवर

संग्रहित छायाचित्र

महाड : गेल्या दोन दिवसांपासून एकीकडे अधूनमधून ढगाळ वातावरण असतानाच उष्णतेने कहर केला आहे. उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. तापमान तब्बल 42 अंशावर जाऊन पोहोचल्यामुळे महाड शहर आणि परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भरदुपारी बाजारपेठ आणि एरव्ही वर्दळ असणार्‍या रस्त्यांवर कमी गर्दी दिसून येत नाही.

सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा सुरू असताना संपूर्ण राज्यात येत्या काही दिवसांत प्रचंड उष्मा जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. या शक्यतेप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्यामध्ये उष्णतेने कहर केला आहे. डोक्यावर सूर्य चांगलाच तापत असून, उन्हाचे चटके सहन करण्यापलीकडे गेले आहेत.

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

वाढत्या तापमानामुळे सकाळी साडेदहा-अकरानंतर फारसे कुणी घराबाहेर पडत नाही. अगदीच महत्त्वाचे काम असेल तर लोक घराबाहेर पडतात. त्यामुळे सकाळी 11 नंतर शहरात सर्वत्र संचारबंदी असल्यासारखे चित्र दिसते. रस्त्यांवर शुकशुकाट असतो.

महाड शहरातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहचले आहे. उष्णता प्रचंड वाढल्याने महाडकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणारे, बाजारात जाणाऱ्या लोकांचा कल थंड पाणी आणि थंड पेये पिण्याकडे असतो. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, त्याचप्रमाणे अंगदुखी आणि डोकेदुखी यासारखे त्रास जाणवतात. यातून बचाव करायचा असेल तर उन्हात बाहेर न पडणे हेच योग्य ठरेल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा… Raigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र

पाणी भरपूर पिणे, त्याचबरोबर डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडणे असे उपाय करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. एकाएकी तापमानाची पातळी 40 अंशांच्या पलीकडे जाणे म्हणजे भविष्यामध्ये विदर्भासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

First Published on: April 15, 2024 8:52 PM
Exit mobile version