गोविंद पानसरे हत्याप्रकरणात दहा जणांवर दोषनिश्चिती; गायकवाड, तावडे यांचाही समावेश

गोविंद पानसरे हत्याप्रकरणात दहा जणांवर दोषनिश्चिती; गायकवाड, तावडे यांचाही समावेश

कॉ. गोविंद पानसरे

Govind Pansare Murder Case |कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येतील १० संशयित आरोपींवर दोषनिश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये समीर गायकवाड आणि वीरेंद्रसिंह तावडे यांचाही समावेश आहे. आता याप्रकरणातील पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! बीडीडी चाळ परिसरातील झोपडपट्टीधारकांना मिळणार ३०० चौ. फुटांचे घर

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एसआयटीने तपास करत १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी १० जणांना अटक झाली असून दोघेजण फरार आहेत. त्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे वर्ग करण्यात आले होते. दरम्यान, आज सोमवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एस.एस.तांबे यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी झाली. या सुनावणीत १० जणांवर दोषनिश्चित करण्यात आली. सर्व संशयित आरोपींनी आरोप नाकबूल केले असून त्यांच्यावर दोषनिश्चिती करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ जानेवारीला होणार असून या सुनावणीत गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. तसंच, आता या प्रकरणातील सुनावणीला वेग प्राप्त होईल, असा विश्वसही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – अवैध मालमत्ता प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस; हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, सहा आरोपी बेंगळुरू येथील कारागृहात असून तिघेजण पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

First Published on: January 9, 2023 9:24 PM
Exit mobile version