TET Exam : टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

TET Exam : टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार, राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होते. यामुळे विद्यार्थ्यांसह विरोधकांनीसुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबरला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आरोग्य विभागाच्या परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहेत. टीईटीची परीक्षा यापुर्वी ३१ ऑक्टोबरला घेण्याचे ठरवले होते मात्र त्याच दिवशी आरोग्य विभागाच्या परीक्षा आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षा पुरपरिस्थितीमुळे देता आली नाही त्या विद्यार्थ्यांसाठीही पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी देण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्य परीक्षा परिषदेने टीईटीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे टीईटीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा ३० ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. राज्यात येत्या ३१ आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असून एकूण ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. आरोग्य विभागाच्या आणि टीईटीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे या परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी बठक घेऊन टीईटी परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. तर टीईटीच्या परीक्षा आदल्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना येत्या काळात होणार्‍या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेनेकडून करण्यात आले आहे.

सीईटीच्या पीरक्षा ८ आणि ९ ऑक्टोबरला

राज्यात कालपासून फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. यानुसार येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन ज्यांचे ज्यांचे झाले आहे. त्यांच्या पुन्हा परीक्षा घेतील. या परीक्षांचे नियोजन पुन्हा एकदा करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन झालेल्या एकाही विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थीनेचे नुकसान होणार नाही याची पुर्ण दक्षता विभागाने घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.


हेही वाचा :  पूरग्रस्तांना पोकळ आश्वासनं नको, प्रत्यक्ष मदत करा- फडणवीसांचं ठाकरे सरकारला आवाहन


 

First Published on: September 29, 2021 8:00 PM
Exit mobile version