खोके म्हटल्यावर झोंबतं का? ते पहिल्यांदा सांगा मग नोटीस; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर

खोके म्हटल्यावर झोंबतं का? ते पहिल्यांदा सांगा मग नोटीस; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला प्रत्युत्तर

खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. शिंदे गटाच्या या इशाऱ्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘त्यांना नोटीस द्याची असेल तर त्यांनी अगोदर त्यांना का खोके म्हटल्यावर का, झोंबले हे सांगावे आणि मग नोटीस द्यावी’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. (Thackeray Group Leader Aaditya Thackeray Slams Shinde Group)

राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. विजय शिवतारे यांच्या इशाऱ्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात पुन्हा जुपली आहे.

“खोके म्हणजे नक्की काय?, त्यांना खोके सरकार म्हटल्यावर का झोंबतंय, हे त्यांनी सांगावं. खोके म्हणजे खोके असतात, आता त्याचा इतर काही अर्थ असेल, तर त्यांनी आम्हाला सांगावा. तसेच, त्यांना नोटीस द्याची असेल तर त्यांनी अगोदर त्यांना का खोके म्हटल्यावर का, झोंबले हे सांगावे आणि मग नोटीस द्यावी”, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

“राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही भेट देत आहोत. पाहाणी करत आहोत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात दोन वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसाना झाले. मात्र आतापर्यंत सरकार म्हणुन कोणीही पुढे आलेला नाही. कृषीमंत्री सुद्धा गायब आहेत. अतिवृष्टीनंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आम्ही जुलै महिन्यामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले होते”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

“ओला दुष्काळ असताना कृषीमंत्री कुठेत हे कोणालाच माहित नाही. उद्योग मंत्रीही काय करत आहेत, हे आपल्याला माहिती नाही, कारण अनेक उद्योग आपल्या महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. कृषी आणि उद्योग आपल्या राज्याचे दोन महत्वाचे घटक आहे. मात्र, सध्या हे दोन्ही घटक कोलमडताना दिसत आहे. पण राज्य सरकार म्हणुन कुठेही हे खोके सरकार पुढे येत नाही”, असा टोला आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना लगावला.

“या गद्दार सरकारमध्ये प्रत्येक जण नुसते घाणेरड्या राजकारणावर फोकस करत आहे. पण आपल्या राज्यातून उद्योग निघून गेले, चार मोठे प्रकल्प निघून गेले, याच्याकडे कोणाचेच लक्ष नाही. राज्यात सगळीकडेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल झालेले असून त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. पोलीस भरती पुढे ढकलली कुठचेही कारण दिले नाही. एकंदरीत बेरोजगार तरुण रस्त्यावर फिरत आहे. महिलांना शिवीगाळ होतेय, तरी देखील कुठे कारवाई होत नाही. हे सगळे पाहता महाराष्ट्र मागे चालल्याचे पाहायला मिळतेय, एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांशीसाठी. आम्ही जनतेची सेवा करत राहणार”, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.


हेही वाचा – कॉंग्रेसला कर्नाटक हायकोर्टाचा दिलासा; भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाऊंट सुरूच राहणार

First Published on: November 9, 2022 11:35 AM
Exit mobile version