घरताज्या घडामोडीकॉंग्रेसला कर्नाटक हायकोर्टाचा दिलासा; भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाऊंट सुरूच राहणार

कॉंग्रेसला कर्नाटक हायकोर्टाचा दिलासा; भारत जोडो यात्रेचे ट्विटर अकाऊंट सुरूच राहणार

Subscribe

काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याच्या निर्णय बंगळुरू न्यायालयाने घेतला होता. मात्र सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याच्या निर्णय बंगळुरू न्यायालयाने घेतला होता. मात्र सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. एका याचिकेवर सुनावणी करत असताना बंगळुरू न्यायालयाने दोन्ही ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनदरम्यान कॉपी-राईट कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे अकाऊंट ब्लॉक करण्यात येणार होते. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

काँग्रेसने एका चित्रपटातील गाणे संबंधित कंपनीच्या परवानगीशिवाय वापरल्याबद्दल काँग्रेसचे आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात यावेत असे आदेश बंगळुरच्या न्यायालयाने दिले होते. काँग्रेसवर ‘KGF-2’ चित्रपटातील गाणे वापरून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘एमआरटी म्युझिक’ने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कंपनीच्या याचिकेवर बंगळुरू न्यायालयाने भारत जोडो अभियानाच्या वेबसाइटवर आणि काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

बंगळुरू न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना बंगळुरू न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात काँग्रेस पक्षातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, 45 सेकंदांच्या क्लिपमुळे काँग्रेस आणि भारत जोडी यात्रेचे संपूर्ण ट्विटर हँडल ब्लॉक करू नये किंवा ते हटवू नये.

- Advertisement -

याप्रकरणी एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरुद्ध कलम 403 (अप्रामाणिकपणे मालमत्तेचा गैरवापर), 465 , 120 कलम 406, 465 आणि 120बी आर/डब्ल्यू कलम 34 अन्वये तक्रार दाखल केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 66 आणि कॉपीराइट कायदा, 1957 च्या कलम 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा – अंधेरी-जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -