राहुल गांधींचा फोन येताच संजय राऊत पोहोचले संसद भवनात; वाचा नेमके प्रकरण काय?

राहुल गांधींचा फोन येताच संजय राऊत पोहोचले संसद भवनात; वाचा नेमके प्रकरण काय?

मोदींच्या नावाने मतं मागितली आणि निवडून आल्यावर पाठीत खंजीर खुपसला यालाच दंश करणं, दुष्टपणा करणं असं म्हणतात, केशव उपाध्येंची राऊतांवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून देशभरातील वातावरण तापले आहे. देशभरात राहुल गांधींचा विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (ठाकरे गट) राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संसद भवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर सावरकर यांच्यावर टीका करण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामधील तणाव आणि वाद संपुष्टात आला आहे. (Thackeray group MP Sanjay Raut and Congress leader Rahul Gandhi met at Parliament House)

नेमके प्रकरण काय?

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी राऊत यांची अर्धा तास चर्चा झाली. भेटीनंतर सर्वकाही आलबेल असल्याचे ट्वीट केले. सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानावर वाद निर्माण झाला होता. सावरकरांविषयीच्या महाराष्ट्राच्या भावना अवगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावून सांगितल्यानंतर वाद संपला होता.

त्यानंतर संजय राऊत व राहुल गांधी यांचे बुधवारी भेटण्याचे ठरले. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला सोनिया गांधी उपस्थित होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असे ट्वीट संजय राऊत यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीनंतर केले.

सावरकरांवरील टीकेचा मुद्दा हा महाविकास आघाडीच्या सोयीचा नाही. त्यांच्याविषयी आमच्या श्रद्धा आहेत आणि त्या तशाच राहतील. आमच्यासाठी ते आदर्श आणि वीरपुरुष आहेत. भाजपाला सावरकरांवर अकारण प्रेमाचे ढोंग करण्याचे एक हत्यार मिळाले आहे ते थांबवले पाहिजे, अशी भूमिका आपण मांडली, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – सरकार नपुंसक; 60 वर्षात महाराष्ट्राचा असा अपमान झाला नाही, शिंदे-फडणवीस सरकारने आत्मपरीक्षण करावे; अजित पवार

First Published on: March 30, 2023 11:51 AM
Exit mobile version