त्यांची काही अमृतवाणी, शिववाणी नाही! आमची दिशा योग्यच…; संजय राऊतांचे गजानन कीर्तिकरांना प्रत्युत्तर

त्यांची काही अमृतवाणी, शिववाणी नाही! आमची दिशा योग्यच…; संजय राऊतांचे गजानन कीर्तिकरांना प्रत्युत्तर

खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले. तसेच, महाराष्ट्रात जेव्हा उद्धवशाही आणि पवारशाही कमी होईल तेव्हा हे एकनाथ शिंदे शिवशाही आणतील, असा हल्लाबोल गजानन कीर्तिकर यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘ही काही अमृतवाणी, शिववाणी नाही. आपण गेलात आमच्या तुम्हाला शुभेच्छा’, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. तसेच, ‘दिशेचे बोलत असाल तर, आम्ही योग्य दिशेवर आहोत. आम्हाला दिशा दाखवू नका. जनता ठरवेल कोणती दिशा बरोबर आहे’, असेही राऊत यांनी म्हटले. (Thackeray Group MP Sanjay Raut Talk On Shinde Group MP Gajanan Kirtikar)

ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खासदार गजानन कीर्तिकर यांना प्रत्युत्तर दिले. तसेच, राज्यातून उद्धवशाही आणि पवारशाही संपुष्ठात आली पाहिजे, असे गजानन कीर्तिकरांनी म्हटले होते. त्याबाबत राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, “ही काही अमृतवाणी, शिववाणी नाही. आपण गेलात आमच्या तुम्हाला शुभेच्छा”, असे उत्तर दिले.

“गजानन कीर्तिकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिले नाही. पाचवेळा आमदार राहिले आहेत. दोन्ही मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले होते. त्यानंतर कीर्तिकरांना पक्षातर्फे दोनवेळा खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमेल कीर्तिकर हे शिवसेनेसोबतच आहेत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

“हा दुर्देवी निर्णय म्हणणार नाही. पण सर्वकाही प्राप्त करून आणि भोगून कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात. तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दा विषयी वेगळी भावना निर्माण होते. फार-फार मोठी सळसळ झाली अशातला भाग नाही. ते गेले लोकल त्यांना उद्या लोक विसरून जातील”, असेही राऊत यांनी म्हटले.

याशिवाय, “मला तुरंगात टाकले. बेकायदेशीर पद्धतीने मला तरुंगात टाकले. पण मी उद्धव ठाकरेंसोबतच राहिलो. मी पक्ष सोडला नाही. दिशेचे बोलत असाल तर, आम्ही योग्य दिशेवर आहोत. आम्हाला दिशा दाखवू नका. जनता ठरवेल कोणती दिशा बरोबर आहे. तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही अंधेरी पोटनिवडणूक लढवायची होती. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह बदलूनही आम्हाला अंधेरी निवडणुकीत 68 हजार मते मिळाली. लोकांनी आम्हाला मतदान दिले. त्यामुळे खरी शिवसेने ही उद्धव ठाकरे यांचीच आहे”, असेही यावेळी राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरेंसोबतच!

First Published on: November 12, 2022 11:20 AM
Exit mobile version