गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरेंसोबतच!

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश केला. गजनन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र असे असताना गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अद्याप उद्धव ठाकरेंसोबतच आहे.

ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. गजनन कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र असे असताना गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर अद्याप उद्धव ठाकरेंसोबतच आहे. अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाला आपला पाठींबा ठाम ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळाता वडील आणि मुलगा यांच्यात राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. (shiv sena mp gajanan kirtikar to join eknath shinde party but amol kirtikar with uddhav thackeray)

खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. कीर्तिकरांच्या प्रवेशानंतर अमोल कीर्तिकर यांनी आपण शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे म्हटले.

“हा माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील”, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले. त्यामुळे येत्या काळात गजानन कीर्तिकर पुन्हा ठाकरे गटात घरवापसी करणार का किंवा अमोल कीर्तिकर शिंदे गटात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणे, हे पक्षासाठी घातक ठरू शकते.

”रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. आज मी शिंदेंसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते पण चालवत पवार होते. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पद दिली. अखेर सर्वांनी बोलून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणे गरजेचे आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतले. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे”, असे गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हटले.

शिंदे गटात सामील झाले 13 खासदार

 • राहुल शेवाळे
 • भावना गवळी
 • कृपाल तुमने
 • हेमंत गोडसे
 • सदाशिव लोखंडे
 • प्रतापराव जाधव
 • धर्यशिल माने
 • श्रीकांत शिंदे
 • हेमंत पाटील
 • राजेंद्र गावित
 • संजय मंडलिक
 • श्रीरंग बारणे
 • गजानन कीर्तिकर

हेही वाचा – शिंदे गटातील प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची ठाकरे गटाकडून पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी