90 कोटींच्या जीएसटी चोरी; ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून पुण्याच्या व्यापाऱ्याला अटक

90 कोटींच्या जीएसटी चोरीच्या आरोपाखाली ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. आकाश संतोष आडागळे असं आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. आकाश हा पुण्यात राहणारा आहे. याप्रकरणी पोलीस आकाशचा साथीदार राजेश उर्फ ​​किरण राव याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे राजेश उर्फ ​​किरण राव याच्याविरुद्ध कल्याण येथील बाजार पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासादरम्यान, जीएसटी अर्जासोबत दिलेला मोबाईल फोन नंबर बदलून कागदपत्रांमध्ये फेरफार करून जीएसटी चुकवल्याचे पोलिसांना आढळून आले.

तपासादरम्यान, आडागळे हे श्रीकृष्ण इन्व्हेस्टमेंट कंपनीत राव यांच्यासोबत व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आडागळे याचा माग काढत त्याला अटक केली. आरोपानुसार, कंपनीने 5 अब्ज 2 कोटी 42 लाख 78 हजार 856 रुपयांचा व्यवसाय केला होता, त्याबदल्यात 9 कोटी 43 लाख 70 हजार 194 जीएसटी भरायचा होता मात्र जीएसटीची रक्कम भरली नाही.

याप्रकरणी भादवि कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 चे कलम 66 (सी) (डी) प्रमाणे 9 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अडागळे याला अटक करण्यात आली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा

First Published on: April 20, 2022 8:59 PM
Exit mobile version