ठाण्यात शिवसेनेला खिंडार, ३ माजी महापौरांसह ६६ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

ठाण्यात शिवसेनेला खिंडार, ३ माजी महापौरांसह ६६ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

ठाण्यात शिवसेनेला खिंडार, ६६ माजी नगरसेवकांसह ३ माजी महापौरांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील संख्याबळ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी संध्याकाळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केय यांच्या नेतृत्वात ६६ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात बुधवारी रात्री ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ‘नंदनवन’ या निवासस्थानावर भेट घेत, त्या सर्वांनी शिंदे यांच्या गटात जाहीरपणे प्रवेश केला. यामध्ये तीन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर , माजी स्थायी समिती सभापती, इतर समितीचे सभापती तसेच माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचा समावेश आहे. यावेळी कल्याणचे खासदार व शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित होते.

लोकसभेच्या प्रतोद पदी नियुक्ती झालेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांचा त्या ६६ माजी नगरसेवकांमध्ये समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये दिसत नाहीत. हकालपट्टी झालेले दोन माजी महापौर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत, शिवसेनेतून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची पहिली हकालपट्टी झाली. त्याच्या काही दिवसांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

खासदार राजन विचारेंच्या पत्नी शिवसेनेतच 

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी राजन विचारे या ठाणे पालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. ठाण्यातील बहुतांश माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु राजन विचारेंच्या पत्नी नंदिनी विचारेंनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. बुधवारी खासदार राजन विचारे यांची लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा : जितेंद्र नवलानींची चौकशी बंद; नव्या सरकारचा संजय राऊत यांना झटका

First Published on: July 7, 2022 11:29 AM
Exit mobile version