वारली आदिवासींच्या उठावाला ७५ वर्षे पुर्ण

वारली आदिवासींच्या उठावाला ७५ वर्षे पुर्ण

वारली आदिवासींच्या एतिहासिक उठावाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात करण्यात येणार आहे. ७५ वर्षांपूर्वी झालेल्या वारली आदिवासींच्या उठावाचे अमृत महोत्सवी वर्ष हे घरावर लाल बावटे लावून साजरे करण्यात येणार आहे. देशभर गाजलेल्या अभूतपूर्व वारली उठावातील हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठीच हे लाल बावटे लावण्यात येणार आहेत.

आज २३ मे रोजी प्रत्येक गावात, पाड्यात घरावर लाल बावटे अभिमानाने फडकवून या एतिहासिक वारली उठावाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहेत. तर कोरोनाच्या लढाईच्या काळात अत्यंत हृदयशून्य, श्रमिकविरोधी, धनिकधार्जिणे, धर्मांध आणि भ्रष्ट ठरलेल्या भाजपच्या मोदी-शहा सरकारविरुद्ध आणि श्रमिकांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशव्यापी हाक दिली आहे. येत्या २७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून गावागावात जोरदार निदर्शनेही करण्यात येणार आहेत.

७५ वर्षांपूर्वी ७ जानेवारी १९४५ रोजी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य किसान सभेची स्थापना झाली. तलासरीचे माह्या धांगडा व इतर १४ आदिवासी प्रतिनिधींनी, जमीनदार-सावकारांनी त्यांच्यावर वर्षांनुवर्षे लादलेली वेठबिगारी, लग्नगडी पद्धत, बेसुमार लूट व अनन्वित अत्याचारांची संतापजनक परिस्थिती या अधिवेशनात मांडली. २३ मे १९४५ रोजी तलासरी तालुक्यात झरी या गावी डहाणू व तलासरी तालुक्यांतील ५,००० आदिवासी स्त्री-पुरुष जमले. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली ही सभा बोलावली गेली. कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांनी वेठबिगारी व लग्नगडी पद्धत नष्ट करण्याची हाक दिली. आणि देशभर गाजलेल्या अभूतपूर्व वारली आदिवासी उठावाची सुरुवात झाली.


हेही वाचा – आता अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल-राज्य सरकार आमने-सामने!


पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांपर्यंत, आणि नंतर नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, नांदेड, यवतमाळ व इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांपर्यंत लाल बावट्याची तेजस्वी चळवळ पसरली आणि वाढत गेली. जेठ्या गांगड पासून ते लक्ष्या बीज, बाबू खरपडे, मथी ओझरे व प्रदीप धोदडेपर्यंत ठाणे-पालघर जिल्ह्यातील ६१ आदिवासी हुतात्म्यांना ब्रिटिश, काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या पोलिसांच्या व गुंडांच्या पाशवी दडपशाहीमुळे वीरमरण आले. नाशिक जिल्ह्यातील लक्ष्मण बागुल याच्यासह ३ हुतात्मे धारातीर्थी पडले.

 

First Published on: May 23, 2020 10:09 AM
Exit mobile version