महसूल विभागाची होणार दप्तर तपासणी

महसूल विभागाची होणार दप्तर तपासणी

जिल्ह्यातील महसूल विभागातील तहसिल आणि उपविभागीय कार्यालयातील येत्या मंगळवार (ता.१७) पासून दप्तर तपासणी होणार आहे. महसूल व वन विभागातर्फे ही तपासणी होणार आहे. महसूल विभागाने दक्षता आणि निरीक्षण पथकातर्फे जिल्ह्यातील तहसिल आणि उप विभागीय आधिकारी कार्यालयातील दप्तरांची दक्षता आणि निरीक्षण पथकामार्फत ३१ ऑगस्टपर्यत तपासणी होणार आहे. दक्षता निरीक्षण पथक प्रमुख दामोधर दळवी आणि दक्षता निरीक्षण आधिकारी डॉ. सुनील निमगावकर यांचे दोन सदस्यीय पथक ही तपासणी करणार आहे.

First Published on: August 12, 2021 3:47 PM
Exit mobile version