समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला

समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला

नाशिक : सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तर्‍हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा पूल काम सुरू असताना अचानक कोसळला.

या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरु होते. मात्र या पुलाचे काम सुरु असतांना सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नागपूर ते शिर्डीपर्यंत या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग सुरु सुद्धा झाला आहे. सिन्नरपासून मुंबईपर्यंत काही ठिकाणी या महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. त्यातच हा पूल कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून समृद्धी महामार्गावरून जाणारा बेलगाव तऱ्हाळे आणि गांगडवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी काम सुरू होते, तो समृद्धीचे काम सुरू असलेला रस्ता असल्याने तेथे वर्दळ नव्हती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुलाच्या चार लेनचे पिलर एका उभ्या असलेल्या पिलरवरून दुसऱ्या पिलरवर बसविण्याच्या प्रयत्नात खाली आले. या पुलाचा जवळपास 200 ते 250 मीटरचा भाग अचानकपणे समृद्धी महामार्गावर कोसळला. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही समाधानाची बाब आहे. समृद्धी महामार्गाचे काम कसेतरी उरकले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे

First Published on: May 9, 2023 1:15 PM
Exit mobile version