अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ; दोन्ही मुलांच्या कंपन्या CBI च्या रडारवर

अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ; दोन्ही मुलांच्या कंपन्या CBI च्या रडारवर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसूलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहेत. सीबीआयने काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. दरम्यान, आता सीबीआयच्या रडारवर अनिल देशमुख यांच्या दोन मुलांच्या कंपन्या आहेत. यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांची दोन मुलं सलील देशमुख आणि हृषिकेश देशमुख यांच्या ६ कंपन्या आहेत. या कंपन्या आता सीबीआयच्या रडारवर आहेत. या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी ही कोलकातामध्ये झोडीयाक डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेड ९/१२ लाल बाजार इ ब्लॉक दूसरा मजल्यावर असलेली ही कंपनी चर्चेत आहेत. कारण २०१७ च्या काळ्या पैसांच्या एका तपासात ह्या इमारतीत जवळपास ४०० शेल कंपन्या (बोगस कंपन्या) आढळून आल्याचा माहिती समोर आली होती. त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ कारपोरेट अफेयर्सने मोठ्या संख्येत यातल्या कंपन्या बंद केल्या होत्या. मात्र रजिस्ट्रार आफ कंपनीच्या रिकार्ड प्रमाणे जवळपास १०० पेक्षा जास्त कंपन्या अजूनही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी सक्रिय जवळपास ३० कंपन्यांच्या रजिस्टर्ड कार्यालयाचा पत्ता तोच आहे जो देशमुखंच्या झोडीयाक डीलकॉम कंपनीचा पत्ता आहे. त्यामुळे सीबीआय अनिल देशमुख यांच्या मुलांच्या कंपन्यांची चौकशी करणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

मार्च २०१९ पर्यंत, झोडीयाक डीलकॉमच्या चार कंपन्या होत्या. १) आयती जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, २) कंक्रीट रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, ३) अटलांटिक व्हिस्टा रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि ४) कंक्रीट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. या कंपन्याच्या आर्थिक व्यवहारांवर सीबीआयला संशय आहे. त्यामुळे सीबीआय या कंपन्यांची चौकशी करणार आहे.

 

First Published on: May 6, 2021 10:22 AM
Exit mobile version