केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी देश गहाण ठेवतंय; अरविंद केजरीवालांचा घणाघात

केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी देश गहाण ठेवतंय; अरविंद केजरीवालांचा घणाघात

‘केंद्र सरकार काही उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी देश गहाण ठेवत आहे. देशातील सर्व संस्थांची विक्री करत आहे’, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान, देशातील अनेक समस्यांवर चर्चा केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, देशभरात वाढलेल्या महागाईवरही चर्चा करण्यात आली. (The central government is mortgaging the country for the benefit of some industrialists says Arvind Kejriwal)

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरेंसह अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत भेटीमागचे कारण स्पष्ट केले. “आजच्या भेटीमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. देशातील समस्यांवर चर्चा केली. देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेऊनही अनेकांना नोकरी मिळत नाही. या युवकांना मोठ-मोठी आश्वासनं दिली होती. 2 ते 4 कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्याची आश्वासने देण्यात आली होती. पण अजूनही नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. इतकी महागाई वाढली आहे की, लोकांना घरचा खर्च भागवता येत नाही. एकीकडे लोकांचा पगार वाढत नाहीये तर, दुसरीकडे त्यांचा खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्राकडून बरेच काही शिकलं – केजरीवाल

“कोरोना काळापासून मला उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती. कोरोना काळात आम्ही एकमनेकांपासून बरंच काही शिकत होतो. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने संपूर्ण राज्यासह मुंबईत कोरोनाला नियंत्रणात ठेवले. आम्ही दिल्लीकरांनी मुंबई आणि महाराष्ट्राकडून बरेच काही शिकलं आहे. कोव्हीडच्या काळात हे सरकार अनेक सराव करत होते. ते सराव आम्हीही दिल्लीत करत होतो. त्यावेळी त्यांचे कार्य उल्लेखनीय होते”, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

माझ्याशी संपर्क करू इश्चित आहेत – उद्धव ठाकरे

संपूर्ण देशातील प्रमुख नेते माझ्याशी संपर्क करू इश्चित आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. आम्ही मागील काही दिवसांपासून भेटण्याच्या प्रयत्नात होते. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जण माझ्या संपर्कात असून, आपल्या देशाला आणखी मजबूत करण्यासाठी आमच्यात चर्चा होत आहे.


हेही वाचा – Big Breaking : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी

First Published on: February 24, 2023 9:01 PM
Exit mobile version