देशाची अर्थव्यवस्था संकटात; म्हणूनच CAA विषय समोर आणला – शरद पवार

देशाची अर्थव्यवस्था संकटात; म्हणूनच CAA विषय समोर आणला – शरद पवार

शरद पवार

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशासमोरचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने जो कायदा केला त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे. एका विशिष्ट नावाच्या लोकांवर त्यांचे लक्ष केंद्रीत झाल आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला संसंदेतही विरोध केला. कायद्यामुळे सामाजिक धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे म्हणून हा विषय समोर आणला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

फडणवीस सरकारवर कॅगचा ठपका 

दरम्यान, शरद पवार यांनी कॅगच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारच्या एका वर्षाच्या काळात विविध कामांवर केलेल्या ६५ हजारांहून अधिक रुपयांच्या खर्चाचा मेळ लागलेला नाही, त्यामुळे अफरातफरीचा धोका संभवतो, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. त्यावर शरद पवार यांनी टिप्पणी केली आहे. विद्यमान सरकारने यासंदर्भात चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा –

आधार कार्डाची गरज काय? राज ठाकरे यांचा मोदी सरकारला सवाल

First Published on: December 21, 2019 12:34 PM
Exit mobile version