हातपाय तोडून हातात देईन…, थकीत पगार मागणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेच्या माजी आमदाराने दिली धमकी

हातपाय तोडून हातात देईन…, थकीत पगार मागणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेच्या माजी आमदाराने दिली धमकी

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांचा एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुकाराम काते एका शिक्षकाशी बोलत आहे. शिक्षकाचा थकीत पगार देण्यात काते नकार देत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून ऐकू येत आहे. त्यामुळे तुकाराम काते यांच्यावर आता टीकेचा वर्षाव होतोय. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत माय महानगर कोणतीही पुष्टी करत नाही.

विनोद पोकळे या शिक्षकाचा गेल्या २३ महिन्यांपासूनचा पगार रखडला असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आला आहे. मात्र, माजी मदार तुकाराम काते त्यांचा पगार देण्यास नकार देत आहेत. विनोद पोकळे इंग्रजी माध्यमात इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. परंतु, तुकाराम काते यांनी गेल्या २३ महिन्यांपासून पगारच दिलेला नाही, यासंदर्भात विनोद पोकळे कातेंसोबत संवाद साधत आहेत. परंतु, पगार देणार नसल्याच्या भूमिकेवर तुकाराम काते ठाम आहेत. हा कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर तुकाराम काते टीकेचे धनी बनले आहेत.

काय आहे ऑडिओमध्ये?

शिक्षक : हाँ सर, नमस्कार. विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. पगार आला नाही सर 23 महिन्याचा.

तुकाराम काते : कोण?

शिक्षक : विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. इंग्लिश मीडियमला. 8 वी, 9 वी. 10वीला शिकवायला.

तुकाराम काते : हां हां…

शिक्षक : पगार राहिला आहे सर 23 महिन्याचा…

काते : तू आता काय कर माहित्ये…

शिक्षक : हां सर

काते : पंतप्रधानांकडे कंप्लेट कर माझी. पगार देत नाही अशी पंतप्रधानांकडे कंप्लेट कर. बारा गावात फिरून येतो, सर्वांना सांगतो माझा पगार दिला नाही… पगार दिला नाही… मी तुला शाळेत असताना ये बोललो होतो, तेव्हा आलाच नाही.

शिक्षक : मी आलतो सर…सर सर सॉरी… तुम्ही…

काते : अरे कधी आला होता? कधी आला होतास रे गाढवा…?

शिक्षक : सर… मी शाळेत आलतो सर… नागेश सरांनी ….

काते : साला हातपाय तोडून हातात देईन तुझ्या जास्त हुशारी केली तर…

शिक्षक : म्हणजे?

काते : समजला काय? साला नालायकगिरी करतो…

शिक्षक : नालायकगिरी काय केली सर?

काते : इकडे जा तिकडे जा… ही नालायकगिरी … नालायकगिरी इकडे तिकडे कुठे जातो… सर्वांकडे जातो…कशाला जातो?

शिक्षक : अहो, सर सर्वांकडे कुठे गेलो… नागेश सर सरळ बोलतात पगार देणार नाही. काय करायचं करून घ्या…

काते : नागेश सर… नागेश नाय… तू दुसरीकडे गेला तर मला फोन आले तिकडून… समजलं..

शिक्षक : सर पगारासाठी मी सहा महिने राऊंड मारत होतो.

काते : तुला कुठं जायचं जा…आणि मला परत फोन केला तर बरोबर करून टाकेल तुला मी.

शिक्षक : म्हणजे सर?

काते : म्हणजे काय नाय… फोन ठेव साल्या XXX

शिक्षक : अहो सर पगार राहिला. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात सर असं बोलतात का?

First Published on: March 31, 2023 10:40 AM
Exit mobile version