एसटीचं ठाणे ठरतय कोरोनाच आगार….. 

एसटीचं ठाणे ठरतय कोरोनाच आगार….. 

कोरोना विरुद्धच्या लढाईतील एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. एसटी मधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. आतांपर्यत राज्यात एकूण २०६  कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित कर्मचारी हे ठाणे विभागात असून त्यांच्या आकडा ८६ इतका आहे. तर मुंबई विभागात ६४  कर्मचारी बाधित झाले आहेत. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून ५  कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.

एसटी महामंडळात खळबळ

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिस,डॉक्टर,नर्स,मंत्रालय,महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने- आन करण्यासाठी बेस्ट आणि एसटीच्या  विशेष फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देतांना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही  उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची विषाणूची बाधा झाली आहे. शनिवारपर्यत राज्यभरात एसटी महामंडळात फक्त ११४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बांधा झाली होती. गेल्या दोन दिवसांत ९२ कर्मचाऱ्यांना बांधा झाली आहे. त्यामुळे आतांपर्यत राज्यात एकूण २०६  कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे.यामध्ये ठाणे विभागात ८६  कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंतचा एसटी महामंडळातील हा आकडा सर्वाधिक आहे. तर मुंबई विभागात  ६४  कर्मचारी बाधित झाली आहे. तसेच एसटी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांनाची बाधित झाले आहे. या  २०६ कोरोनाबाधीत पैकी ५ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

एसटीचा अजब सल्ला

मुंबई, ठाण्यासह अन्य विभागात मोठया प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाबाधित कर्मचारी संख्या व एसटी महामंडळाच्या आकडेवारीत बरीच तफावत आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना  त्यांच्या गावी जाण्याचा अजब सल्ला अधिकारी वर्गाकडून  दिला जात आहे. त्यामुळे गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सुद्धा धोका निर्माण होत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या औषधाचा खर्च उचलणे गरजेचे आहे. तसेच त्यांना सकस आहार देणे आणि विलगीकरण कक्षांची सुविधा एसटी महामंडळाने दिली पाहिजे आहे. मात्र यावर एसटी महामंडळाकडून कसलीही सुविधा देत नाही, हे चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

First Published on: July 6, 2020 2:49 PM
Exit mobile version