पोलीस संपुर्ण अभ्यास करूनच गुन्हा दाखल करतात; राणा दाम्पत्यांवरील राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

पोलीस संपुर्ण अभ्यास करूनच गुन्हा दाखल करतात; राणा दाम्पत्यांवरील राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

पवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर “राणांवरील राज द्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच दाखल करण्यात आला आहे. तसंच, न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा निर्णय आहे”, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

“पोलीस कोणताही गुन्हा दाखल करत असताना त्याचा संपुर्ण अभ्यास करूनच दाखल करत असतात. तसंच, न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा निर्णय असून कोर्टाला निरिक्षण नोदवण्याचा अधिकार असतो”, असंही वळसे-पाटील यांनी म्हटलं.

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत.

राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आंदोलन मागे घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे, असे मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर राणा दांपत्याला अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने राणा दांपत्याला जामीन दिला होता.


हेही वाचा – वाझे, परमबीर नंतर पोलिसातील नवा लेटर बॉम्ब, IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली

First Published on: May 6, 2022 4:03 PM
Exit mobile version