चंद्रकांत पाटलांनी केला ‘अब की बार २२० पार’चा उलगडा

चंद्रकांत पाटलांनी केला ‘अब की बार २२० पार’चा उलगडा

'अब की बार २२० पार'चा खुलासा

सभागृहात विरोधकच राहिले नाहीत, तर सभागृह चालविण्यात मज्जा येणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी ‘अब की बार २२० पार’चा नारा भाजपाने दिला असल्याचा खुलासा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आज सुरुवात झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – युवक काँग्रेसचा ‘वेकअप महाराष्ट्र’चा नारा

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘अब की बार २२० पार’चा नारा भाजपाने दिला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता भाजप २५० चा आकडाही सहज पार करेल, असा विश्वास भाजपला आहे. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र वेगळेच मत मांडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आज सुरुवात झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता भाजप २५०चा आकडा सहज पार करेल. पण सभागृहात जर विरोधकच राहिले नाहीत तर सभागृह चालविण्यास मज्जा येणार नाही. त्यामुळे भाजपचा ‘अब की बार २२० पार’चा नारा योग्य आहे. यावेळी भाजप २२० जागा सहज जिंकेल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर मांडले मत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरूवात झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारने मराठा समाजाची केलेली फसवणूकीवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की,”मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले. मराठा समाज शिक्षणापासून वंचित रहावा, म्हणून आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. परंतू आमच्या सरकारने निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला. यापूर्वीचे नेते केवळ एका समाजाचे नेते होते. पण राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे सर्व समाजाचे नेते असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती केली.”

First Published on: August 1, 2019 8:38 PM
Exit mobile version