टिकली प्रकरणावर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ; संभाजी भिडे नेमकं काय म्हणणार?

टिकली प्रकरणावर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ; संभाजी भिडे नेमकं काय म्हणणार?

शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यताने चर्चेत येत असतात. काहीच दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी असेच एक विधान केले होते त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला होता. सर्वच स्तरातून संभाजी भिडे यांच्या विधानावर निषेध करण्यात आला होता. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस सुद्धा पाठवली होती. यालाच आता संभाजी भिडे उत्तर देणार आहेत.

महिला पत्रकाराशी बोलताना टिकली-कुंकू लावण्याचा आग्रह धरणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला आात संभाजी भिडे उत्तर देणार आहेत. यासाठी महिला आयोगाला त्यांनी दहा दिवसांचा कालावधी देण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा – आम्हाला पोलीस व्हॅनसमोर उभे करा आणि.., राहुल गांधींविरोधात मनसेचं प्रीप्लॅन आंदोलन

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी यासंर्भात ट्विट करत माहिती दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अपमान करणाऱ्या संभाजी भिडें यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे.

संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधान करत असतात त्यामुळे ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी येत असतात. राज्य महिला आयोगाने जी नोटीस पाठवली आहे त्याला संभाजी भिडे काय आणि कसं उत्तर देतात हेच पाहणे महत्वाचे आहे.

हे ही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांचा बळीराजाला दिलासा; शेतीपंपाची वीज न कापण्याचे महावितरणाला आदेश

First Published on: November 22, 2022 8:43 PM
Exit mobile version