घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री फडणवीसांचा बळीराजाला दिलासा; शेतीपंपाची वीज न कापण्याचे महावितरणाला आदेश

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा बळीराजाला दिलासा; शेतीपंपाची वीज न कापण्याचे महावितरणाला आदेश

Subscribe

राज्यात अनेक भागांमधून शेतीपंपांचा वीज पूरवठा खंडीत करुन वीज जोडण्या तोडल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला हे आदेश दिले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिल थकल्याने महावितरणने कारवाईचा बडगा उगारत शेतीपंपाचे वीजजोड तोडण्याची मोहीम सुरु केली होती. दरम्यान या सगळ्या कारवाई थांबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे राज्यातील शेतकरी सुद्धा त्रस्त झाले होते. अशातच शेतकऱ्यांवर महावितरणने वीजतोडीची कारवाई सुरू केली होती. आधीच त्रस्त असलेले शेतकरी महावितरणच्या या कारवाईमुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. वीज बिल न भरल्याने शेतीच्या पंपाचे वीज जोड तोडण्यात येत होते. पण अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे शेती पंपाची वीज तोडण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतरकऱ्यांना काई प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

महावितरणने थकीत वीज बिलांच्या वसूलीसाठी राज्यात शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरु केली आहे. थकीत वीज बिल न भरल्यास वीज मिळणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात वीज कपात झाल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला. शेतकऱ्यांची हीच अडचण समजून घेऊन नुकसानग्रस्त भागातील आणि त्याच सोबत ज्या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरले आहे अशा शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करु नये असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस (dcm devendra fadnavis) यांनी दिले.

राज्यात अनेक भागांमधून शेतीपंपांचा वीज पूरवठा खंडीत करुन वीज जोडण्या तोडल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला हे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काही दिवसांपासून महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना विजबिलात सूट देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्यासाठी तगादा न लावता त्यांच्याकडून सध्याचे वीज बिल घ्या. राहिलेले बिल भविष्यात घेता येईल पण शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज तोडू नका असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


हे ही वाचा – पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, डी गँगकडून मुंबई पोलिसांकडे आला धमकीचा मेसेज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -