मनसुख हिरेन यांची सरकार पुरस्कृत हत्या, खासदार मनोज कोटक यांचे ट्विट

मनसुख हिरेन यांची सरकार पुरस्कृत हत्या, खासदार मनोज कोटक यांचे ट्विट

खासदार मनोज कोटक

मनुसख हिरेन यांच्या मृत्यूवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून मंगळवारी विधानसभेत जोरदार गदारोळ झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पोलीस अधिकारी सचिन वाझेंना तात्काळ निलंबित करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखला देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचे म्हटले. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मात्र, राज्य सरकारने अजून वाझे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. विधानसभेत फडणवीस यांनी पुरावे सादर केल्यानंतरही राज्य सरकार वाझे यांच्यावर कारवाई करत नसल्याने भाजपचे खासदार मनोज कोटक ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

सर्वात अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वात हत्या

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे सादर केले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा ज्याप्रकारे बचाव करत आहे ते पाहता, मनसुख हिरेन यांची महाविकास आघाडी सरकारमधील सर्वात अनुभवी आणि सर्वोत्कृष्ट नेत्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार पुरस्कृत हत्या झाल्याचे दिसते,’ असे खासदार मनोज कोटक त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

 

First Published on: March 9, 2021 9:32 PM
Exit mobile version