मोठी बातमी ! राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

मोठी बातमी ! राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

मोठी बातमी ! राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

महाराष्ट्रातील सिनेमागृह अखेर २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दिग्दर्शक, मुख्य सचिव, सिनेमागृहाचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात हॉटेल, विमानसेवा आणि सिनेमागृह सुरु करण्यात आली आहेत. तर आता थिएटर्स सुरु करण्यात यावेत अशी मागणी सिनेमागृहांच्या मालकांकडून करण्यात येत होती. सिनेमागृहांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सिनेमागृह सुरु करण्यास अखेर परवानगी दिली आहे. सिनेमागृह सुरु करण्यात येणार असल्यामुळे कलाकार, सिनेमागृह आणि थिएटर्सवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे.

सिनेमागृह सुरु करण्यासाठी राज्यातील सिनेमागृहांचे शिष्टमंडळ, दिग्दर्शक, निर्माते, प्रोड्यूसर यांचे प्रतिनिधी मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवसस्थानी बैठकीसाठी गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थिएटर्स सुरु करण्यसाटी बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सर्व कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व सिनेमागृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी थिएटर्सच्या शिष्टमंडळाने केली होती. मुख्यमंत्र्यांनी बराच विचार करुन अखेर थिएटर्स सुरु करण्या परवानगी दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि तिसऱ्या कोरोना प्रादुर्भावाच्या लाटेची शक्यता आहे. यामुळे थिएटर्स सुरु करताना सर्व कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, प्रेक्षकांच्या आरोग्याची सर्व काळजी घेण्यात येईल अशी व्यवस्था करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सिनेपॉलिस, बॉक्स ऑफिस, पीवीआर आणि छोट्या सिनेमागृहांचे शिष्टमंडळ होते. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टी, मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपस्थि होते.

नाट्यगृहसुद्धा २२ ऑक्टोबरपासून सुरु

चित्रपटगृहांसह नाट्यगृहेदेखील २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यतात आलेल्या बैठकीला टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

संजय राऊत करणार होते चर्चा

शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील सिनेमागृहांचे शिष्टमंडळ भेटले होते. आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं होते. महाराष्ट्राच्या आजूबाजूंच्या राज्यामध्ये सिनेमागृह सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात नाट्यगृह, सिनेमा गृह सुरु व्हावेत, आता लोकल सुरु झाल्या आहेत. हॉटेल सुरु झाले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर सिनेमागृह सुरु झाले आहेत. एअरलाईन्स सुरु आहेत. रेल्वे, रेस्टॉरंट सुरु आहेत. मुंबई ही फिल्म उद्योगाची जनक आहे. इथेच सर्व ठप्प झाल्यामुळे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या सर्वांच्याच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार सांगेल त्या नियमांचे पालन करुन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विचार करावा अशी विनंती राऊत यांनी केली होती.

काय आहे नियमावली

सिनेमागृहात आसन क्षमतेच्या ५० टक्केपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी.
थिएटरमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
एक सीट सोडून बसण्यास परवानगी द्यावी, येथे बसू नये असे फलक लावण्यात यावे
प्रेक्षकांना हँडवॉश आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे
आरोग्य सेतू मोबाईलमध्ये असणे गरजेचे असू शकते
प्रवेश करताना प्रेक्षकांचे थर्मल स्क्रिनिंग करावे
कोरोना लक्षणे नसणाऱ्यांना प्रवेश द्यावा
व्यवहार शक्यतो डिजिटल पद्धतीने करण्यात यावा
गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी
काऊंटरवर गर्दी टाळण्यासाठी तिकीट बुकींगची सुविधा द्यावी


हेही वाचा : सिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य


 

First Published on: September 25, 2021 2:51 PM
Exit mobile version